💻

💻

दोन दुचाकी धडकल्या; एकाचा मृत्यू #chandrapur #gadchandur #Korpana

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- दोन दुचाकींच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास गडचांदूर येथील सना पेट्रोल पंपाजवळ घडली. माहिती मिळताच गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेह रुग्णालयात हलविला. परमेश्वर केंद्र ( ४२ ) असे मृताचे नाव आहे.
ते येथील अंबुजा सिमेंट कंपनीत कार्यरत होते. बुधवारी दुपारी ते सना पेट्रोलपंपावर दुचाकीत पेट्रोल टाकून जात असताना चंद्रपूर वरून येत असलेल्या विशाल गोरे यांच्या दुचाकीची धडक बसली. यात परमेश्वर केंद्र यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पुढील तपास गडचांदूर पोलिस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत