💻

💻

हरवलेला मुलगा वडीलांना सुपूर्द #police #Korpana


कोरपना पोलिसांची कामगिरी
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- पोलीस स्टेशन हद्दीतील बोरंगाव जवळ २८ जुलै रोजी सकाळी एक लहान मुलगा पोलीसांना मिळाला. पोलीसांनी त्याला पोलीस स्टेशन येथे आणले. पोलीसांनी विचारपूस केली मात्र त्या मुलाला व्यवस्थितपणे बोलता येत नव्हते. त्याच्या पालकाचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी सोशल मीडियाचा वापर करून त्यावर सदर मुलाचे फोटो टाकले. 'जर कोणी या मूलाला ओळखत असेल तर त्यांनी संपर्क साधावा' असे आवाहन केले होते.
सोशल मीडियावर मुलाचा फोटो जलदगतीने व्हायरल होताच मुलाच्या वडिलांनी पोलीस स्टेशन गाठले. भीमराव धर्मा सिडाम असे वडिलाचे नाव आणि मुलाचे नाव करणूं भिमराव सिडाम आहे.
कोरपनाचे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या नेतृत्वात मुलाला वडिलाच्या सुपूर्द करण्यात आले. वास्तविक पाहता सोशल मीडियाचा वापर अनेक चांगल्या कामांसाठी केल्या जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत