गोंडपिपरी:- तालुक्यातील शिवणी (देशपांडे) येथील नाल्यासमोर वैनगंगा नदीच्या काठावर अज्ञात महिलेचा मृतदेह आढलून आला.हा धक्कादायक प्रकार आज दि. (२९ ) शुक्रवारी समोर आला.
शिवणी (देशपांडे) येथील नदीकाठावर विद्युत ट्रान्सफॉर्मर जवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह प्लास्टिक मध्ये गुंडाळून असल्याची गुप्त माहिती ठाणेदार जीवन राजगुरू यांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली.
माहितीच्या आधारावर घटनास्थळ गाठून ठाणेदारांनी मृतदेह ताब्यात घेतले. हा कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे ओळख पटवणे शक्य नाही. मृतदेह वैनगंगा नदीपासून ५० फूट अंतरावर आहे. आठवडाभर पूरपरिस्थिती असल्याने मृतदेह वाहून आला की घातपात आहे. यादृष्टीने पोलीस तपास करीत असून प्लास्टिक मध्ये मृतदेह आढळल्याने घातपाताची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठवण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार राजगुरू करीत आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत