बुडणाऱ्याला वाचवण्यासाठी गेला अन् जीव गमावला #chandrapur

Bhairav Diwase

मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद

चंद्रपूर:- तलावावरील बंधाऱ्यावरून एक जण वाहून गेला. तो अडकला असताना त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दोन जणांनी आपला जीव धोक्यात टाकला. हा मृत्युचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेत नंदलाल कैथवास या तरूणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना जिल्ह्यातील जुनोना येथे घडली.
जुनोना तलाव तुडुंब भरल्याने त्यावर बांधलेला बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. यात एक व्यक्ती वाहून गेला. त्याला वाचवण्यासाठी गावकऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. दोरीच्या साहाय्याने तो तग धरून होता. 
त्याला ओढण्याच्या प्रयत्नात दोघांचा तोल गेला. त्यातील एकाला कसेबसे पकडण्यात आले. मात्र दुसरा या प्रवाहात ओढला गेला आणि गटांगळ्या खायला लागल्या. त्याला वाचवण्यासाठी तिसऱ्याने उडी मारली आणि थोड्या वेळात तो देखील पाण्यात पडला. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एकोर्निया या वनस्पतीच्या झुडुपामुळे त्यांना वाचवण्यास अडचण येत होती. यापैकी एक जण वाहून गेला आहे.