Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo



 

कोरोना काळापासून काही ठिकाणची बंद असलेली लालपरी बस सेवा सुरु करा* #Chandrapur

म.रा.प.म.चं विभागीय नियंञक कार्यालयाकडे निवेदन पाठवून भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावारांनी केली मागणी
चंद्रपूर:- कोरोना काळापासून काही ठिकाणची बंद असलेली लालपरी बस सेवा सुरु करण्याची मागणी भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी केली आहे.यासंदर्भात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ,विभागीय नियंञक  कार्यालय चंद्रपूर यांच्याकडे निवेदन पाठविण्यात आले.
सदर निवेदनात महेश कोलावार यांनी म्हणाले की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चंद्रपूर विभागांतार्गत येणा-या काही भागातील सकाळ,दुपार,राञ व तर काही भागातील पूर्णपणे लालपरी (एस.टी) बस सेवा कोरोना काळापासून बंद केली आहे.
त्यात चंद्रपूर-कोरपणा(व्हाया भोयगाव)
व इतर काही भागातील लालपरी बस सेवा अद्यापही बंद असल्याने त्या भागातल्या विद्यार्थी,कर्मचारी,नागरिकांना दळण-वळण सेवेच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सोबतच चंद्रपूर-माजरी दिवसभरासाठी व
चंद्रपूर-गडचिरोलीसाठी रा.७ वा.दरम्यान 
एक नवीन बस सुरु करावी अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
चंद्रपूर हे जिल्हा मुख्यालयाचे व मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे सर्व प्रवाशांना आवश्यक त्या बाबीसाठी याचठिकाणी यावे लागते.तरी सर्व अडी-अडचणी लक्षात घेता सदर लालपरी बस सेवा त्वरीत सुरु करावी अशी मागणी महेश कोलावार यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत