तापाने फणफणलेल्या लेकीला खांद्यावर घेऊन 4 किलोमीटर जंगलातून पायपीट #chandrapur #gondpipari

Bhairav Diwase
चंद्रपूर:- तापाने फणफणलेल्या लेकीला खांद्यावर घेऊन चार किलोमीटर जंगलातून पायपीट करावी लागल्याचा दुर्दैवी प्रसंग चंद्रपूर जिल्ह्यात समोर आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सलग तीन दिवस पूरपरिस्थिती आहे. जिल्ह्यातील बहुतांश नदी-नाल्यांना पूर आला आहे तर अनेक मार्गावरील वाहतूक बंद पडली. अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील आर्वी गावाला देखील पुराने वेढा दिला आहे. गावातील नथ्थू वागदरकर यांची दीड वर्षाची मुलगी लावण्या ही दोन दिवसांपासून तापाने फणफणत होती. मुलीची प्रकृती चिंताजनक झाली. मात्र पुराने वेढा दिला असल्याने उपचारासाठी न्यायचे कसे? हा मोठा प्रश्न आई-वडिलांना पडला. अशात दीड वर्षाच्या लावण्याला खांद्यावर घेत आई-वडिलांनी कन्हारगाव अभयारण्यातील घनदाट जंगलातून चार किमीचे अंतर पायी कापले.
कोठारी पोलिसांना याची माहिती देण्यात आली होती. कोठारी पोलीस रुग्णवाहिका घेऊन मदतीला पोहोचले. मुलीला उपचारासाठी चंद्रपूरला हलवण्यात आले आहे.