जनतेच्या हक्काचा बुलंद आवाज म्हणजे सुधीरभाऊ:- राहुल पावडे #chandrapur

Bhairav Diwase

भाजपातर्फे फटाके फोडून, मिठाई वापट करून जल्लोष साजरा
चंद्रपूर:- आमदार सुधीर मुनगंटीवार म्हटलं की, चौफेर विकास असे काही समीकरण जिल्ह्यात झाले आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मागील मंत्रीपदाच्या कार्यकाळात अनेक महत्वकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आले, एवढेच नाही, तर चंद्रपूर शहरात देखील सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात विविध प्रभागात विकासाची गंगा पोहोचली, सिमेंट रस्ते, अमृत योजनेचे पाणी, हायमास्ट, आणि विविध कल्याणकारी योजनांचा लाभ गरजु व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यात भाजपा कार्यकर्ते कार्यरत आहेत. प्रबळ झंजावतात हिमालयसारखे उत्तुंग आणि अवचित नेतृत्व असे असलेले चंद्रपूर जनतेच्या हक्काचा बुलंद आवाज म्हणजेच लोकनेते विकास पुरुष अशी ख्याती असलेले विकासासाठी अग्रेसर असणारे सुधीर मुनगंटीवार यांची आज राज्याच्या कॅबिनेट मत्री पदी वर्णी लागल्यावर पुन्हा विकासाचा झंझावात सुरू होईल, असे प्रतिपादन माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने आज मंगळवारी जटपुरा गेट परिसरात जल्लोष कार्यक्रम घेण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्थानिक जटपूरा गेट येथे ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून नागरिकांना मिठाई वाटप करून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
या कार्यक्रमाला रवी आसवानी, सविता कांबळे, प्रशांत चौधरी, छबुताई वैरागडे, राहुल घोटेकर, शितल आत्राम, अरुण तिखे, रवी लोणकर, चांद सय्यद, प्रमोद शिरसागर, सुरेश हरीरमानी, भारती दूधानी, अक्षय शेंडे, संदीप सद्वय, महेश राऊत, अमित गौरकार, अमोल मते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व महानगरातील पदाधिकारी जटपुरा गेट येथे ढोल ताशांच्या निनादात गुलाल उधळून फटाके फोडून मिठाई वाटून जल्लोष साजरा केला