Top News

आयुध निर्माणीच्या कराटेपटुंचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुयश #bhadrawati


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथील चांदा आयुध निर्माणीच्या कराटेपटुंनी नुकत्याच कोलकाता येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चॅम्पियन स्पर्धेत सुयश प्राप्त केले आहे.
कोलकाता येथील नेताजी इंदौर स्टेडियमवर पार पडलेल्या अंतरराष्ट्रीय कराटे चैंपियनशिपचे आयोजन आंतरराष्ट्रीय सेशिनकाई सीटो-रियो कराटे जनरल सेक्रेटरी ऑल इंडिया सेशिनकाई कराटे फेडरेशन मुख्य हंसी प्रेमजीत सेन यांनी केले होते. या स्पर्धेत बांग्लादेश ,नेपाळ ,मॅनमार, साऊथ आफ्रीका, अफगानिस्तान, श्रीलंका, तिमोर लिस्ट इत्यादी देशांच्या अनेक खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यात भारताकडून महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने भद्रावती येथील आयुध निर्माणीतील सेई शिनकाई शितो रियु कराटे स्कुलच्या खेळाडूंनी केले.
 यात सोमक तालुकदार  गोल्ड मेडल, आरुषि राजू गेड़ाम  गोल्ड मेडल, हर्षिता धर्मेंद्र वंजारी  सिल्वर मेडल यांनी कताश विभागात विजय प्राप्त केला. कुमिते विभागात तन्वी राकेश पवार, हर्षिता धर्मेंद्र वंजारी,  प्राजक्ता इंद्रपाल ताकसांडे, साई तेजा भीमन्ना पुल्हारी यांनी विजय प्राप्त केला. वेट कॅटेगिरीत गोल्ड मेडल प्राप्त करणा-यांमध्ये राधे प्रकाश सेडाम, हिरल अमोल दशक, राजदर्शन राकेश पावरा, जय राजू शिंदे या खेळाडूंनी वेट केटेगरीमध्ये सिल्वर मेडल्स  
प्राप्त केले.
      महाराष्ट्र राज्य सेई शिनकाई शितो रियु कराटे असोसिएशन चे  सिहान के. श्रीनिवास प्रशिक्षक .सेंसाई विनोद सोनारकर ,सेंसाई वेंकटराव, सेंसाई नरेश आणि सेंसाई नीलेश सातपैसे, आयुध निर्माणी चे महाप्रबंधक, अधिकारी गण आणि भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, कुशल मेश्राम, सिकंदर शेख ,चंदू खारकर, संदीप ढेंगळे, सूरज गावंडे, प्रशांत झाड़े यांच्याकडून सर्व कराटे खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. म.रा.म. पत्रकार संघ भद्रावतीतर्फे शंकर बोरघरे यांनी सुद्धा अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने