Top News

एक भारत श्रेष्ठ भारत ओलींपीक २०२२ स्पर्धेत भद्रावतीचे कलाकार अव्वल #chandrapur #bhadrawati #dance


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
नुकत्याच गोवा येथील मडगाव येथे पार पडलेल्या 'एक भारत श्रेष्ठ भारत' या राष्ट्रीय शालेय डान्स स्पर्धेत पुन्हा एकदा भद्रावतीचे कलाकार अव्वल ठरले आहेत.

याकरिता आपल्या भद्रावती मधील स्कारपिअंन्झ डान्स अकादमीचे कोरीओग्राफर सागर मामीडवार आणि त्यांचे विद्यार्थी आर्शना घोरपडे, मृगया खोब्रागडे, स्वरा ढुमने, अवनी बन्सोड, यशस्वी गाडगे, देवयानी पाचभाई, गोजिरी घुगुल,लक्ष्मी ससाने, सानिका पाचभाई, अंश कामटकर, मैथिली पारेकर या सर्वांनी खुप परिश्रम घेतले.
यात एकल गट व समुह गट या दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. त्यात क्लासिकल,भरतनाट्यम,ईन्डियन फाॅक, वेस्टर्न अशा वेगवेगळ्या प्रकारांचा समावेश आहे. यात वेस्टर्न समुह गटात २५ समुह डांन्स आणि वेस्टर्न एकल गटांत २८ एकल डान्स अशा विविध राज्यांतील शाळांनी भाग घेतला. त्यापैकी भद्रावती शहरातील सेंट ॲनेस हायस्कूल सुमठाणा शाळेने या राष्ट्रीय डान्स स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच वेस्टर्न एकल गटांत मृगया खोब्रागडे या विद्याथीनींने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच ज्युनिअर वेस्टर्न गटांत संपूर्ण राज्यातून ३० शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात नारायणा विद्यालय पडोली प्रथमच सहभागी होऊन अंश कामटकर या विद्यार्थ्यांने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तसेच ईन्डियन फाॅक ज्युनिअर गटांमध्ये संपूर्ण राज्यातून ३० शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये भद्रावती येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल मधिल मैथिली पारेकर या विद्यार्थ्यीनीने या राष्ट्रीय डान्स स्पर्धेमध्ये पहिल्यांदा सहभागी होऊन तृतीय क्रमांक पटकावला. असे भद्रावती क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच घडले आहे.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्व भद्रावतीकर, सर्व शाळांचे प्राचार्य, वर्ग शिक्षक, नृत्य प्रशिक्षक यांनी कौतुक केले आहे. हे सर्व यशवंत विद्यार्थ्यी येथील स्कारपिअन्झ डान्स अकॅडमी येथे अनेक वर्षापासून डान्स प्रशिक्षण घेत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने