Click Here...👇👇👇

चेक आष्टा शाळेत तान्हा पोळा सण साजरा #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
पोंभुर्णा:- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण पोळा व तान्हा पोळा साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने दिनांक २९ ऑगस्टला ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चेक आष्टा येथे वर्ग 1 ते 8 च्या विद्यार्थ्यांनी मातीची बैलं स्वतः बनवून, सजवून आणली.

सुंदर अशा ग्रामीण वेशभूषेत चिमुकले नटुन थटुन आली. तान्हा पोळ्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटीका सादर केले. मातीच्या बैलांचा तान्हा पोळा भरवून आज आवतन घे उद्या जेवायला येण्याचे आमंत्रण देण्यात आले. श्री. रवींद्र मडावी शा.व्य. समिति सदस्य यांच्या पाठोपाठ हर हर महादेव असा जयघोष करण्यात आला.
तान्हा पोळा सणाविषयी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक यामावार सर, विनोद पोगुलवार सरांनी माहिती सांगितली. प्रसाद वाटुन तान्हा पोळा सण साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.