गडचांदुर शहरात मनसेला मोठा धक्का #Korpana #Gadchandur

Bhairav Diwase

येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत राजु गर्गेलवार हे सत्ताधारी, विरोधी पक्षांच्या नेत्यांना माणिकगड किल्याचा घाट दाखविणार म्हणजे दाखविणार..!

मनसेचे निष्ठावंत मनसे माजी कोरपना तालुका उपा. अध्यक्ष राजू गर्गेलवार, मनसे चे सध्याचे कोरपना तालुका उपा. अध्यक्ष राजु चौधरी व ज्यांना गडचांदुर शहराचे युवा राजकीय चाणक्य मानल्या जातो असे अक्षय भांदक्कर यांची नाराजी समोर आली.

राजु गर्गेलवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष स्थापनेपासुन पक्षात अनेक चड - उतार आले पणं कधीही डगमग लो नाही. अनेक पोलीस केसेस दाखल झाल्या तुरुंगात राहिलो तरी पणं हिंदुहृदयसम्राट सन्माननीय श्री. राज साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता होतो आणि आहोत. परंतु २० वर्षापासून पक्षात असून तालुका पद सांभाळले, गाव तिथे शाखा खोल्ली पक्षात वाढ झाली. मला कुठल्याही प्रकारची माहिती नसताना २०१९ पंचवार्षिक निडणुकांपूर्वी माझ तालुका उपा. अध्यक्ष पद काढून दुसऱ्याला देण्यात आले. ३ -४ वर्षापासून कोणताही पद नसून देखील पक्ष वाढविण्यासाठी काम केलं. परंतु काल आढावा बैठक घेतली असून मला वेळेवर कळविण्यात आले होते. व बैठकी दरम्यान माझा दूजाभाव झाला. साहेबांवर अफाट प्रेम करतो आणि माझे शेवट पर्यंत साहेबांवर अफाट प्रेम राहणार.
राजु चौधरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष स्थापनेपासुन पक्षात काम करत होतो. मी स्थानिक पदाधिकारी यांच्यावर नाराज आहोत, जिल्हा पदाधिकाऱ्यांवर नाही. आढावा बैठकीत मी कोरपना तालुका उपा. अध्यक्ष पदावर असून मला डावलण्याचा प्रयत्न करत असून, मला दूजाभावाची जाणीव बैठकी दरम्यान स्थानिक पदाधिकारी यांच्या कडून दिसून दिली.
अक्षय भांदक्कर मी सध्या कठल्याही पद्धतीच वक्तव्य करणार नाही परंतु वेळ आल्यावर मी माझी भूमिका प्रसार माध्यमातुम स्पष्टपणे जाहीर करणार.
गडचांदुर शहरातील डॅशिंग नेते राजु गर्गेलवार, राजू चौधरी, अक्षय भांदक्कर यांची शहरात मनसे नेते म्हणुन‌ चांगलीच ओळख आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या मनसे नेत्यांनी स्थानिक पदाधिकारी यांच्यावर नाराज असल्याचंही त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
आम्हाला बऱ्याच पक्षांकडून ऑफर्स आल्या आहेत. मात्र, आम्ही विचारकरूनच पुढचा निर्णय घेणार. मात्र, आम्हाला जिल्हा पातळीतील पदाधिकारी भेटून त्यांच्यासमोर आमची भूमिका मांडण्याची वेळ आल्यावर त्यांना मनातली खद- खद सांगणार.