💻

💻

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त पोंभुर्ण्यात भव्य महाआरोग्य शिबीर संपन्न #pombhurna


चंद्रपूर:- आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयातात दरवर्षीप्रमाणेच आज भव्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.


या शिबीरात दत्ता मेघे हॉस्पिटल सावंगी (मेघे), लता मंगेशकर हॉस्पिटल, आणि शासकीय दंत महाविद्यालय नागपूर तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपुर येथून सर्व प्रकारच्या आजारांवरील तज्ञ व नामांकित डॉक्टर्स आणि त्यांच्या चमू याठिकाणी दिवसभर सेवेत होते.
नेत्रतपासणी व चष्मेवाटप, बुस्टर डोस लसीकरण, ईसीजी तपासणी, त्वचारोग, दंतरोग, स्त्रीरोग, बालरोग, कर्करोग, अस्तिरोग यांपासून तर मॅमोग्राफी, न्युरो तपासणी इ. अशा सर्व प्रकारच्या आजारांवर या शिबिरात तालुक्यातील गोरगरीब नागरिकांना तज्ञ डाॅक्टरांकडून औषधोपचार व मार्गदर्शन मिळाले.


या कार्यक्रमात बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की, खरेतर, मी मार्गदर्शनासाठी नव्हे तर आभारासाठी उभा आहे. लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस म्हणजे सेवादिवस. आणि या सेवादिवसाच्या यशस्वीतेसाठी आपण याठिकाणी आलात, आपल्या सेवेची संधी आम्हाला दिली यासोबतच माझ्या सरकाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून कष्ट घेतले, विविध ठिकाणच्या डाक्टर्सनी वेळ दिला. त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो.
दरवर्षीप्रमाणेच यंदाही आजच्या महाआरोग्य शिबीराचा लाभ तालुक्यातील अनेक गरजूंना झाला.
पुढे बोलताना, शिबिरावेळी चार ईसीजी मशिनच्या माध्यमातून ६० रुग्णांवर उपचार झाले तर २०० रक्तचाचण्या आणि १०६ नागरिकांवर दंतोपचारार्थ पार पडले. यावेळी शिबिरात 4000 लोकांनी विविध विभागात येऊन तपासणी व लाभ घेतला.
लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात अशाप्रकारचे सेवाभावी कार्य या परीसरात अविरतपणे यापुढेही होत राहतील. यानिमित्तानं भगवान राजराजेश्वराचरणी प्रार्थना करतो की त्यांनी आदरणीय सुधीरभाऊंना उत्तम दिर्घार्युरारोग्य द्यावे. असेही ते म्हणाले.
समारोपीय कार्यक्रमानंतर तालुक्यातील आशाभगीनींना आ. सुधीरभाऊंकडून स्नेहभेट म्हणून देण्यात येत असलेल्या ब्लँकेट व साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
या शिबिराला, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, चंद्रपूर मनपाचे आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत, डॉ. रवी आलुरवार, डॉ. सुशील मुंदडा, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष कु. अल्काताई आत्राम, नगराध्यक्षा सौ. सुलभाताई पीपरे, उपनगराध्यक्ष अजीत मंगळगिरीवार, माजी जि. प. सदस्य राहुल संतोषवार, महामंत्री ईश्वर नैताम, हरीश ढवस, नंदुभाऊ तुम्मलवार, ज्योती बुरांडे माजी उपसभापती,भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अजय मस्के, लता मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉ. अनुप्रिया भराटे, दत्ता मेघे हॉस्पिटलचे मुरलीधर उमाटे, शासकीय दंत महाविद्यालय नागपूरचे डॉ. अनिकेत धोटे, डॉ. राधिका सिंह, मेडिकल असोसिएशनचे गोपाल एकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मामिडवार, राजू मोरे,सरपंच बंडू बुरांडे, शहराध्यक्ष ऋषी कोटरंगे, महिला मोर्चाच्या शहरअध्यक्षा सौ. वैशालीताई बोलमवार, नगरसेवक महेश रणदिवे, संजय कोडापे, दर्शन गोरंटीवार, नंदा कोटरंगे,श्वेता वनकर, रोहिणी ढोले, आकाशी गेडाम, उषा गोरतवार, पांडुरंग पाटील पाल,रोशन ठेंगणे, गंगाधर मडावी, मोहन चलाख, सुनील काटकमावर,अरूण कुत्तरमारे, नैलेश चिंचोलकर, प्रभाकर पिंपळशेडे,रणजित पिंपळशेडे, दशरथ फरकडे, गणपती फरकडे रमेश वेलादी, रमाकांत पावडे, कौशिक काळे,जनार्धन सातपुते, केशव गेलकीवार,श्यामसुंदर मडावी, मंगेश उपरे,जनार्धन लेनगुरे, रवी गेडाम ,विनोद मारशेट्टीवर,चंद्रशेखर झगडकर,पिंटू गौरकर, विकास दिवसें,  अरुण कुत्तारमारे,नवनाथ आत्राम, प्रेमदास इस्टाम, विनोद कानमपल्लीवार, वैभव पिंपळशेंडे,  राजू ठाकरे,आकाश वडपल्लीवर अमोल मोरे, अमोल पाल वैशाली वासलवार, उषारांनी वनकर, नाना पोगुलवार यांचेसह यांचेसह पोंभुर्णा तालुक्‍यातील प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक/नगरसेविका, कार्यकर्ते, आशाभगीनी तसेच मोठ्या संख्येने शिबिरार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत