मूल:- मूल शहरातील ८००
कुटूंबांना अर्धमेलं करून गेलेल्या पावसाची भिती काही केल्या जात नाही आहे. पाऊस येण्याच्या कपनेनेच अंगावर शहारे येतात. काही दिवस तरी वेळ मारून घेऊ म्हणून पाच हजाराचा लॉलीपॉप दिला जाणार आहे म्हणे पण ढग जमले की पुन्हा पाऊस घरात घुसल का जी भाऊ ? हा सवाल कायम आहेच.
महसूल विभागाचा ढिसाळपणा इथेही बघायला मिळाला आहे. पटवारी किंवा कुठला अधिकारी पंचनामा करायला गेल्याचे व खरे पंचनामे झाल्याचे दिसले नाही. कोतवालाची वारी मात्र ५ हजाराची मुनारी देत भर पावसात फिरताना दिसली. कुणाचे किती नुकसान झाले ? कुणाच्या कुटूंबाची, संसाराची काय अवस्था झाली आहे हे जर यांनी जवळून बघीतले असते, तर या ८००
घरच्या माऊल्यांच्या भेदरलेल्या, धास्तावलेल्या नजरा प्रत्यक्ष अनुभवून यांनाही ५ हजाराचे चनेफुटाने ऑनलाईन द्यायला नक्कीच बरे वाटणार नाही.
शेकडो घरातील दैनंदिन उपयोगी साहित्याची ,अन्नधान्याची ,बांधकामांची, वाहनांची झालेली वाताहत, अवस्था अंगावर शहारे
आणणारी आहे व ही भिती कायम मनात बसली म्हणून आता ढग जमले की ...पुन्हां घरात पाणी घुसल का भाऊ म्हणून डायरेक्ट आमदार सुधिरभाऊंना सवाल केला जातो. नैसर्गीक आपत्तींस शासन जबाबदार नाही असे म्हणायचे नाक अधिकारी व
लोकप्रतिनिधींना नाहीच कारण यंदा पावसाने जो घात झाला तो निव्वळ तात्रीक चुकांमूळे, नियोजनाचा अभाव व दर्जाहीन बांधकामे हिच या मागची प्रमुख कारणे. बरं भरपाई सोडा, तेवढं करायची बिशाद नसेत पण कमितकमी कुणीतरी सामोर येऊन लवकरात लवकर तांत्रीक चुका दुरूस्त करून भविष्यातील सुरक्षिततेची हमी तर दयायला हवी. मला वाटते आमदार सुधिरभाऊंनाच पुढे येऊन हे करावे लागेल.....!
मूल शहरातील ८०० कुटूंबांना ४० लाखाचे फुटाने वाटून
बाजी मारली हे समजणारा येडयात गणला जाईल व मूल शहरातील काही ठेकेदार राजकारणी यात आहेत. कारण नागरीकांना दुरगामी व्यवस्था हवी आहे. नाहीतर येत्या न.प. निवडणुकीत हे जिवघेणे पाणीसंकट पेट्रोल चे काम करणार आहे. (क्रमश:)