बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह आढळला #RAJURA

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- मागील आठवड्यात विरूर पोलीस ठाण्यात एक ३२ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होती. हा तरुण आपल्या पत्नीसह सिकंदराबाद - तेलंगणा येथून बडनेरा महाराष्ट्राकडे रेल्वेने जात होता. दरम्यान, सदर युवक विरूर-विहिरगाव रेल्वे स्थानकादरम्यान अचानक बेपत्ता झाला होता. आज पाच दिवसांनंतर या बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह रेल्वे रुळालगतच्या जंगलातील झुडपात सापडला आहे.हा अपघात की घातपात अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,कुशल खत्री आणि त्यांची पत्नी खुशबू महाराष्ट्र-सिकंदराबाद एक्स्प्रेसने हैदराबादहून बडनेराला जात होते.कुशल हा सकाळी सहाच्या सुमारास विरूर रेल्वे स्थानकाजवळून जात असताना अचानक बेपत्ता झाला. त्याच्या पत्नीला हे कळताच तिने ही बाब बल्लारपूर रेल्वे पोलिस तसेच विरूर पोलिस स्टेशनला कळवली. विरूर पोलिसांनी विरूर स्टेशन ते विहिरगाव स्टेशन दरम्यान संपूर्ण रेल्वे लाईन परिसरात शोध घेतला मात्र कुशल कुठेच सापडला नाही.अखेर हताश पत्नीने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडे मदतीचे आवाहन केले.घटनेचे गांभीर्य पाहून खासदार नवनीत राणा यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले.अशी माहिती प्राप्त आहे.आज सकाळी रेल्वे कर्मचारी विहीरगाव रेल्वे स्थानकाजवळ काम करत असताना त्यांना रेल्वे रुळाजवळील झुडपात एक मृतदेह दिसला. याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच विरूर पोलीस ठाण्याचे पोलीस ठाणेदार राहुल चव्हाण यांनी पोलीस कर्मचार्‍यांसह घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला.
मृतदेह बेपत्ता कुशल खत्रीचा आहे,हे पोलीसांना पचंनाम्यात कळले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजुरा येथे पाठविण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, विरूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.यावेळी हेडकॉन्स्टेबल दिवाकर पवार, वाघधरकर मेजर, विजय मुंडे, अशोक मडावी, काळे, मिलमिले आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत