Top News

जनतेसाठी अहोरात्र काम करणारे "देवराव दादा" chandrapur


चंद्रपूर:- काल दि. 06/08/2022 ला घुग्गूस येथील तलावाचे व वेकोली च्या रेल्वे सायडिंग चे पाणी बँक ऑफ इंडिया परिसरातील नागरिकांच्या घरात शिरल्याने अनेक घरांच्या भिंती कोसळल्या व दैनंदिन उपयोगात येणारे साहित्य पाण्यात वाहून गेले होते, ही बाब भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे यांना लक्षात येताच त्यांनी कुठलाही विलंब न करता तत्काळ आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन त्या परिसराची पाहणी केली व साधारण 500 लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली.


आज दि. 07/08/2022 रोजी आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून शेकडो परिवारांना अन्नधान्य किट चे वितरण केले. लगेच बहिरम बाबा देवस्थान जवळ वेकोली विरुद्ध रस्तारोको आंदोलनाला सुरुवात केली, काही वेळातच वेकोली चे महाप्रबंधक कावळे साहेब यांनी आंदोलन स्थळी जाऊन देवराव दादा यांची भेट घेतली व त्यांच्या मागणीला होकार देत लगेच वेकोलीच्या मशीनी बोलावून स्वतः हजर राहून कामाला सुरुवात केली व आता रात्री चे 9 वाजत आहे. तरी देखील वेकोली चे महाप्रबंधक कावळे साहेब व श्री देवराव दादा यांच्या उपस्थितीत काम सुरु आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने