Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

लोकप्रिय पोस्ट

गावंडे परिवारातील बालकांनी तान्हा पोळ्यातून केले थोर पुरुषांना अभिवादन #Bhadrawati


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथील कॅटरर्स ॲन्ड मंडप डेकोरेशन असोसिएशन तर्फे तान्हा पोळ्यानिमित्य येथील भद्रनाग मंदिराच्या प्रांगणात आयोजित नंदीबैल सजावट स्पर्धेत थोर पुरुषांचा देखावा सादर करून गावंडे परिवारातील बालकांनी थोर पुरुषांना अभिवादन केले.
  दरवर्षी या ठिकाणी नंदीबैल सजावट स्पर्धेचे आयोजन करून तान्हा पोळा साजरा केला जातो. या स्पर्धेत दरवर्षी गावंडे परिवारातील बालके विविध विषयांना घेऊन समाजप्रबोधन पर आकर्षक देखावे सादर करतात. मागील वर्षी कोरोना काळात डेंग्यू या आजाराचा विषय घेऊन घरूनच त्याबद्दल जनजागृती केली. तर त्याच्या मागच्या वर्षी कोरोना  हा विषय घेऊन घरीच सुंदर देखावा तयार केला होता. येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते स्व. जगन्नाथ गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या परिवारातील बालके मागील अनेक वर्षांपासून हे देखावे सादर करीत होती. ही त्यांची परंपरा त्यांचे सुपुत्र अमोल गावंडे आणि विशाल गावंडे यांनी पुढे चालू ठेवली आहे.
      यंदाच्या तान्हा पोळा उत्सवात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून थोर क्रांतिकारक भगतसिंग, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची वेशभूषा करून सुंदर देखावा सादर केला. त्यात हार्दिक विशाल गावंडे या बालकाने भगतसिंग, वेदांती अमोल गावंडे या बालिकेने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि उन्नती अमोल गावंडे या बालिकेने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची वेशभूषा करून या महान क्रांतिकारकांना अभिवादन केले. त्यांच्यासोबत विधी दीपक आसुटकर आणि समृद्धी संदीप कोंगरे या चिमुकल्यांनीही त्यांचे सहकारी म्हणून देखाव्यात सहभाग दर्शविला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत