'सच परेशान हो सकता है,पराजित नहीं हो सकता' ना. सुधीर मुनगंटीवार #chandrapur


चंद्रपूर:- सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी असलेल्या प्रकरणामुळे राज्यातील सरकार अस्थिर होईल, अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. अशा कोणत्याही चुका झालेल्या नाही, ज्यामुळे सरकारचे अस्तित्व धोक्यात येईल. त्यामुळे या जर तरच्या गोष्टीत काही अर्थ नाही. हे सरकार स्थिर आणि मजबूत आहे, असे मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. विरुध्द निकाल लागण्यासाठी असा कोणताही मुद्दा सुप्रिम कोर्टात नाही की, ज्यातुन सरकार अस्थिर होऊ शकते. जनतेचं सरकार आहे.'सच परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता' असेही ते म्हणाले.
अनंत चतुर्दशीपर्यंत पालकमंत्र्यांची घोषणा....

ना. मुनगंटीवार ज्या मुद्दांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यातील एकही मुद्दा आणि त्याबाबतच्या येणार्‍या निकालामुळे राज्यातील विद्यमान सरकार अस्थिर होऊ शकत नाही. कारण सरकारच्या बहुमताला प्रभावित करेल असा एकही मुद्दाच त्यात नाही. त्यामुळे हे सरकार टिकेल आणि उत्तम काम करेल. येत्या अनंत चतुर्दशीपर्यंत राज्यातील पालकमंत्रीही जाहीर होतील, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत