Top News

जन्मदात्या बापाकडून विष पाजून मुलांची हत्या #chandrapur #warora



चंद्रपूर:- पोटचा दोन मुलांना विष पाजून बापाने हत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात घडली आहे.
वरोरा शहरालगत बोर्डा या गावांमध्ये कांबळे हे परिवार राहत असून संजय श्रीराम कांबळे हे शिकवणी वर्ग घेण्याचे काम करत होते. गेल्या काही दिवसापासून मानसिक परिस्थिती ढासळल्याने शिकवणी वर्ग सुद्धा बंद करण्याच्या मार्गावर आले होते. त्यांची पत्नी कॉलेजमध्ये कंत्राटी बेस वर काम करत असून संसार सुरळीत चालला होता.
मात्र, या सुखी संसाराला त्यांच्याच वडिलांची नजर लागली. दोन्ही मुलांना सुमित संजय कांबळे 7 वर्ष, मुलगी मिस्त्री संजय कांबळे 3 वर्ष, या दोघानाही राहत्या घरी विष देऊन हत्या करण्यात आली. यानंतर मुलाची आई घरी आल्यानंतर दार उघडून पाहताच दोन्ही मुले बेडवर पडून असल्याचे दिसतात आईने आरडाओरडा सुरू केला.
या दोन्ही मुलांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत दोन्ही मुलाची प्राणज्योत मावळली होती. या हत्ये मागील कारण अजून पर्यंत कळले नाही. कुटुंबातील परिवारावर शोककळा पसरली असून प्राथमिक अंदाजानुसार विष पाजून व मुलांचा गळा आवळून हत्या केली असल्याचा अंदाज वरोरा येथील उप रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. या घटनेने परिसरात स्मशान शांतता पसरली असून वरोरा पोलीस आरोपी वडीलांचा शोध घेण्यासाठी कसून प्रयत्न करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने