Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

गणेशोत्सवाच्या संध्येला चंद्रपुरात निघाली तलवार #chandrapur #Swords


दहशत माजविणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक
चंद्रपुर :-दि. 31/08/2022 रोजी पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांना गोपनिय खबर मिळाली की, एक इसम महाकाली कॉलरी चंद्रपूर परिसरात एक इसम तलवार घेवून फिरत आहे अशा खबरेवरून पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी लागलीच संदिप कापडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे नेतृत्वात तसेच पोस्टाफ पो.हवा. संजय आतकुलवार, नापोशि संतोष येलपुलवार, पोशि रविंद्र पंधरे, पोशि नितीन रायपुरे असे पथक तयार करून पथकास सुचना देवून महाकाली परिसरात त्या ईसमाचे शोधार्थ रवाना केले.
सदर पथकाने खबरे प्रमाणे इसमाचा शोध घेतला असता तो महाकाली कॉलरी परिसरात तलवार घेवून फिरत असतांना दिसून आला. त्या इसमास पथकातील अधिकरी व अंमलदार यांनी शिताफीने ताब्यात घेतले. व पंचासमक्ष त्यास नाव गाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव व्यंकटेश उर्फ व्यंक्या कोपेलवार रा आनंद नगर महाकाली कॉलरी चंद्रपुर असे सांगीतले. त्याचे ताब्यातील धारधार तलवार पंचनामा कार्यवाही करून ताब्यात घेण्यात आली. तलवारी बाबत आरोपीस विचारपूस केली असता सदर तलवार त्यास त्याचे दोन साथीदारांनी दिल्याचे सांगीतले. कसुन विचारपूस केली असता त्याचे घरी तलवारी व खंजर ठेवून असल्याचे सांगीतल्याने पंचासमक्ष त्याचे घराची झडती घेतली असता त्याचे घरात तीन तलवारी व एक खंजर मिळून आले. दोन्ही आरोपींचा शोध घेतला ते मिळून आले नाही नमुद आरोपींविरूद्ध पो.स्टे. चंद्रपूर शहर येथे फिर्याद दिल्याने त्याचे विरूद्ध पो.स्टे. अप.क्र. 484 / 2022 कलम 4, 25 भारतिय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री अरवींद साळवे यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्था.गु.शा. चे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, पो उप नि अतुल कावळे, पो. हवा. संजय आतकूलवार, ना.पो.कॉ. संतोष येलपुलवार, पो. कॉ. नितीन रायपुरे, रविंद्र पंधरे यांनी केली असुन पुढील तपास पो.स्टे. चंद्रपुर शहर येथील पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत