Top News

नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी 'स्टार्टअप' यात्रेचा लाभ घ्या - चंद्रपूर जिल्हाधिकारी #chandrapur



(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
चंद्रपूर:- राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व नाविण्यता विभागातर्फे 26 ऑगस्ट 2022 पासून जिल्हामध्ये स्टार्टअप व नाविण्यता यात्रेला सुरवात झाली आहे.

आज (दि.1) स्टार्टअप योजनेचा जनजागृती करणारा एलईडी चित्ररथ चंद्रपूरमध्ये दाखल झाला. प्रत्येक तालुक्यात या योजनेविषयी जनजागृती करण्यात येत असून आपल्यातील नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी विद्यार्थी आणि नवउद्योजकांनी स्टार्टअप यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांना स्टार्टअप योजनेबाबत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त भैयाजी येरमे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे, शैलेश भगत आदी उपस्थित होते.
कौशल्य विकास विभागामार्फत स्टार्टअप यात्रेला सुरवात झाल्याचे सांगून जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले, नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणणे, उद्योग उभारणे आदींबाबत यात मार्गदर्शन करण्यात येत आहे. कोणत्याही उद्योगाचे सुरवातीला स्टार्टअपच असते. नंतर तो उद्योग विस्तारला जातो. उद्योगात समस्यांवर मात करून त्याची सोडवणूक करणे गरजेचे आहे. त्यासाठी अभिनव कल्पना राबविल्या तर शासनाचे पाठबळसुध्दा मिळते. त्यामुळे या योजनेची सर्वांनी माहिती घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
स्टार्टअप यात्रेने गुरवारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, आंबेडकर कॉलेज, सरदार पटेल महाविद्याल आदी ठिकाणी भेटी दिल्या. 26 ऑगस्ट रोजी चिमुर तालुक्यातून सुरू झालेली यात्रा 3 सप्टेंबर 2022 रोजी राजुरा तालुक्यामध्ये समाप्त होत आहे. यात्रेचा कॅम्प 5 व 6 सप्टेंबर 2022 रोजी चंद्रपूर येथे आयोजीत करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील नवसंकल्पना घेवून उद्योग सुरू करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी नोंदणी करून सादरीकरण करावे.
उत्कृष्ट, प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या सादरीकरणात अनुक्रमे रु.25 हजार, 15 हजार व 10 हजार रु.पारितोषिक देण्यात येणार असून या माध्यमातून विभागीय तसेच राज्यस्तरावर सादरीकरण सादर करण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे. सदर यात्रेमध्ये सहभागी होण्याकरीता http:it.ly/EntrepreneurSpeaker या लिंकचा वापर करावा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने