Top News

घरघुती गणपतीसाठी ' फिरते विसर्जन कुंड ' व सार्वजनीक गणेश मंडळांसाठी ' निर्माल्य संकलन रथाचे ' उद्घाटन #chandrapur



(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
चंद्रपूर:- श्रीगणेश उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा व विसर्जनापर्यंत या उत्सवाचे पावित्र्य अबाधित राहावे यासाठी चंद्रपूर महानगरपालिका प्रशासन सज्ज असुन उत्‍सवादरम्‍यान होणारी गर्दी टाळण्‍यास चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे‘ विसर्जन आपल्या दारी ’ उपक्रमांतर्गत' फिरते विसर्जन कुंड ' व ' निर्माल्य संकलन रथ ' आज सुरु करण्यात आले. आयुक्त राजेश मोहीते यांच्या हस्ते फीत कापुन दोन्ही रथ लोकसेवेत रुजू करण्यात आले.याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे, शहर अभियंता महेश बारई उपस्थीत होते. शहरात दीड दिवसाचा, पाच दिवसाचा तसेच दहा दिवसाच्या गणपतींचे विसर्जन केले जाते.
श्री गणेशमूर्ती विसर्जनप्रसंगी होणारी गर्दी टाळण्यासाठी मनपातर्फे २३ कृत्रिम तलाव व २० निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली आहे. या व्यवस्थेमध्ये अधिक भर घालत चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील घरघुती गणपती मूर्ती संकलनासाठी ' फिरते विसर्जन कुंड ' व सार्वजनीक गणेश मंडळांसाठी 'निर्माल्य संकलन रथ' कार्यरत ठेवण्यात येत आहे.
सदर वाहन शहरात फिरून नागरिकांच्या घराजवळून श्रीमूर्ती संकलित करतील व त्यांचे विधीवत विसर्जन करतील याकरीता नागरिकांना झोन १ साठी 9881590402, 9011018652, झोन २ साठी 8806515483, 9011018652,झोन ३ साठी 8805147197, 9011018652 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. फोन केल्यास विसर्जन रथ आपल्या घरापर्यंत येईल. निर्माल्य संकलन करण्यासाठी सार्वजनीक गणेश मंडळांना 89997 86030 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
गणेशोत्सव पर्वावर महानगरपालिका राबवित असलेल्या विविध सोयीसुविधांचा लाभ घ्यावा व गणेशोत्सव शांततेत पार पाडावा असे आवाहन महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने