Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

बैलं मालकाचा मृतदेह घेऊन घरी पोहचल्यानंतर बसला धक्का...


नागपूर:- नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील मांगली गावातील सोमेश्वर पोपटकर आणि गुंडेराव गेडाम हे शेतातून घरी परतत असताना वीज कोसळली. त्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे. बैल मृतदेह घेऊन घरी पोहचल्यानंतर कुटुंबियांना धक्का बसला.
बैलगाडीवर वीज कोसळल्यानंतर गुंडेराव यांचा मृतदेह चालत्या बैलगाडीमधून खाली कोसळला. सोमेश्वर पोपटकर यांचा मृतदेह बैलगाडीमध्येच होता. वीज कोसळल्याची बैलांना कल्पना नव्हती. बैलगाडी मालकाचा मृतदेह घेऊन बैल थेट घरी पोहोचले. तेव्हा वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गावकऱ्यांना कळली. दोघांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत