Top News

दूषित पाणीपुरवठ्यामुळे पोंभूर्णाकरांचे आरोग्य धोक्यात #chandrapur #pombhurna


शहरात तापाची साथ
पोंभूर्णा:- मागील काही दिवसांपासून शहरातील घरघुती नळाला हिरवट-पिवळसर रंगाचे पिण्याचे पाणी येत आहे. तसेच अनेक नळाच्या तोट्यांमध्ये जंतू आढळून आले असल्याने या दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.व शहरात तापाची साथ सुरु असुन प्रत्येक प्रभागातील कुटुंबात एक तरी व्यक्ती तापाने फनफनत आहे. वारंवार नगरप्रशासना ला सुचना व लेखी निवेदन देऊन ही शनिवार ला सकाळी जंतूयुक्त दुषीत पाणी पुरवठा झाल्याने संतप्त नगरसेवक आशिष कावटवार व अतुल वाकडे यांनी नगर पंचायतच्या विरोधात रोष व्यक्त केला. नगर पंचायत प्रशासनाला सर्वसामान्यांच्या वेदना कळणार कधी व केव्हा असा प्रश्नही उपस्थित करून एक दिवसाआड पाणी पुरवठा करणाऱ्या नगरपंचायत प्रशासनाने या बाबत गांभीर्याने पावले उचलावी अशी मागणी केली आहे.
शुक्रवार ला प्रभाग क्र. ४,५,७, व ९,१३ या भागात सुद्धा जंतूयुक्त पाणीपुरवठा झाल्याने गटनेता आशिष कावटवार यांनी जलशुद्धीकरण केंद्रावर धडक देऊन पाणी पुरवठा कर्मचारी येलूरवार,मुकरु यांना धारेवर धरले होते. शहरात गेल्या काही दिवसांपासून दुषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वारंवार होत असतानाही नगर प्रशासनाकडून पाहिजे तशी दखल घेतली जात नसल्याने नागरिकांच्या भावना दुखावून संताप वाढला आहे. शहरातील अनेक नागरिकांच्या घरी जंतूयुक्त पाणी आल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली. शहरात मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन मध्ये लिकेज निर्माण झाल्याने होणाऱ्या दुषित व जंतूयुक्त पाण्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. नगर पंचायत प्रशासन याची गांभीर्याने दखल आता तरी घेईल का...? असा प्रश्न विरोधी पक्षनेता आशिष कावटवार,नगरसेवक अतुल वाकडे यांच्यासह अनेक नगरसेवक व नागरिकांनी केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने