Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo



 

बंगाली कॅम्प येथील अंगणवाडीचे बांधकाम त्वरित करा #chandrapur


भद्रावती युवा सेनेची मागणी
भद्रावती:- भद्रावती शहरातील बंगाली कॅम्प परिसरातील अंगणवाडी इमारतीचे बांधकाम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे भद्रावती युवा सेना उपशहर प्रमुख तथा युवा परिवर्तन ऑटो असोसिएशन भद्रावतीचे अध्यक्ष कल्याण मंडल यांनी केली आहे.
भद्रावती शहरातील बंगाली कॅम्प येथील जिल्हा परिषद शाळेच्या खुल्या जागेत अंगणवाडीचे बांधकाम प्रस्तावित होते. त्यासाठी भद्रावती नगर परिषदेचे ना हरकत प्रमाणपत्रही मिळालेले आहे. मात्र या अंगणवाडीचे बांधकाम अद्यापही सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे या अंगणवाडीचे बांधकाम त्वरीत सुरु करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात भद्रावती येथील बालविकास प्रकल्प अधिकारी यांना नुकतेच निवेदन सादर करण्यात आले.
सदर ठिकाणी अंगणवाडी बांधकामाचा प्रस्ताव होता व तो मंजूरही झालेला आहे. या बांधकामासाठी सन २०२१ मध्ये भद्रावती नगर पालिकेचे ना हरकत प्रमाणपत्रही प्राप्त झाले. मात्र अद्याप हे बांधकाम सुरू करण्यात आलेले नाही. ही अंगणवाडी तात्पुरत्या जवळील पांडववार्ड येथे समाज मंदिरात भरविण्याचे विचाराधीन आहे. मात्र ही जागा दूर अंतरावर असल्यामुळे ती लहान मुलांना त्रासदयाक ठरणार आहे. त्यामुळे नियोजित जागेवरच या अंगणवाडीचे बांधकाम त्वरीत सुरू करावे अशी मागणी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
  निवेदन सादर करताना कल्याण मंडल, विकास सेल, सुभाष मंडल, कैलास साखरकर, प्रशांत अनमोलवार, अजय देवगडे, गौतम पाटील, युवा सेनेचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत