चिंतामणी कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायंन्स गोंडपिपरी येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा

Bhairav Diwase
0
गोंडपिपरी:- श्री समर्थ शिक्षण संस्था अहेरी द्वारा संचालित चिंतामणी कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायंन्स गोंडपिपरी येथे दिनांक 24 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे शारीरिक निर्देशक डॉ. आर. एस. तिवारी उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापिका पूनम चंदेल मॅडम उपस्थित होते.
प्राध्यापक महेंद्र डी. अक्कलवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर डॉक्टर आर. एस. तिवारी सर यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व पटवून दिले व राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत कोणते कार्यक्रम राबविले जातात व त्याचा समाजाकरिता होणारा फायदा यावर विस्तृत मार्गदर्शन केले तसेच समाजसेवा करण्याकरता विद्यार्थ्यांना आवाहन केले की त्यांनी समाज उपयोगी कार्य मोठ्या उत्साहाने करावे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉलेज चे प्राचार्य डॉ. आशिष चव्हाण यांचे सहकार्य लाभले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. महेंद्र अक्कलवार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे सह. कार्यक्रम अधिकारी प्रा. उमेश वरघणे सर यांनी मानले कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)