मुली व पत्नीला मेसेज करून इसमाने केली आत्महत्या #chandrapur #suicide

Bhairav Diwase

रामाळा तलावात घेतली उडी
चंद्रपूर:- "मी आत्महत्या करतोय" असा संदेश पत्नी व मुलीला व्हॉट्सॲपवर पाठवून इसमाने चंद्रपुरातील रामाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी ८.३० वाजताच्या दरम्यान घडली. प्रकाश बाबूराव पोटवार ( ४ ९ , रा . रामनगर , चंद्रपूर ) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी प्रकाश घराबाहेर पडला. त्यानंतर काही वेळात त्याने आपल्या पत्नी व मुलीच्या मोबाइलवर "मी आत्महत्या करतोय" असा संदेश पाठवला. लगेच त्यांनी प्रकाशचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र काही वेळातच त्याने रामाळा तलावात उड्डी घेतल्याची माहिती समोर आली.
 याबाबतची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच एपीआय योगेश हिवसे व रामनगर पोलिसांची चमू घटनास्थळ दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला. आत्महत्येचे कारण कळले नसून पुढील तपास पोलिस करीत आहेत.