पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा येथील महिला समूह महिला अंतर्गत तक्रार निवारण समिती, महिला अध्ययन, सेवा केंद्र, आय क्यू एस सी आणि शिक्षण मंडळ, विदर्भ प्रांत यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यशाळेचे आयोजन दिनांक 23 सप्टेंबर 2022 शुक्रवार रोजी करण्यात आले. कार्यशाळेचा विषय रिसर्च पेपर रायटिंग स्किल डेव्हलपमेंट हा होता आणि कार्यशाळा आंतर महाविद्यालय स्तरावर घेण्यात आली.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुधीर हुंगे कार्यकारी प्राचार्य चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा, सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, प्रमुख मार्गदर्शक प्रशांत आर्वे सहसचिव विदर्भ प्रांत भारतीय शिक्षण मंडळ, प्रमुख अतिथी डॉ. एन. एच. पठाण प्राचार्य चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा, डॉ. ओमप्रकाश सोनोने प्राचार्य चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा तसेच डॉ. शीला नरवाडे विभाग प्रमुख इंग्लिश चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा तथा सिमेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली डॉ मेघा कुलकर्णी अध्यक्ष महिला समूह अंतर्गत तक्रार निवारण समिती, महिला अध्ययन आणि सेवा केंद्र चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलन व गोंडवाना विद्यापीठ गीताने झाली. मंचावरील मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर नवनिर्वाचित सिनेट सदस्य डॉ. सुधीर हुंगे आणि डॉ. शीला नरवाडे यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. सत्कार मूर्ती यांनी आश्वासन दिले की विद्यार्थी कल्याणाकरिता जे योग्य कार्य करता येईल ते करण्यास आम्ही नेहमी पुढाकार घेऊ.
प्राचार्य डॉ. एन. एच. पठाण सर डॉ. ओमप्रकाश सोनोने सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. सुधीर हुंगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना रिसर्च पेपर लिहिणे किती गरजेचे आहे आणि रिसर्च पेपर लिखाण व्हायला हवे त्यावर सुंदर रित्या समजावून सांगितले
कार्यशाळा मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रशांत आर्वे यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे उपस्थितांना पेपर लिहिताना काय मुद्दे लिहायचे, संदर्भ कसे शोधायचे इत्यादी उदाहरणासहित समजावून सांगितले कार्यशाळेला विद्यार्थी तसेच प्राध्यापक उपस्थित होते.
डॉ. मेघा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संचालन प्राध्यापक वर्षा शेवटे, रसायनशास्त्र विभाग आणि आभार डॉक्टर वैशाली मुरकुटे प्राणीशास्त्र विभाग यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. सरोज यादव, प्रा. अनंत देशपांडे आय. क्यू. एस. सी. समन्वयक, प्रा. आकाश बागडे, हर्षद गद्देवार, अंकुश बुक्कावार, गितेश उराडे, श्रीमती ईश्वरी उराडे, श्री राजू बोयनपल्ली यांचे मोलाचे सहकार्य लाभले.