श्री. प्रितम घोनमोडे, सेवादाता व पशु सखी सौ.शारदा रितेश आसमवार यांचे मुख्य योगदान
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- पशु वैद्यकीय दवाखानना मुधोली चेक न. 2 अंतर्गत मौजा मुधोली चेक न. 1 येथे लम्पी रोगाची लसीकरण शंभर टक्के करण्यात आले. श्री. सजय शेडमाके पो. पा. श्री. दिलीप वर्धलवार उपसरपच श्री.डी.आर. सरकार, पशुधन पर्यवेक्षक श्री. प्रितम घोनमोडे, सेवादाता श्री.गेडाम परीचर, सौ-शारदा रितेश आसमवार पशुसखी, गावातील सर्व पशुपालक उपस्थित होते. गावात फवारणी करण्यात आली. व लंपी रोगावर कश्या प्रकारे नियंत्रण करण्यात येईल त्यासंदर्भात मार्गदशर्न करण्यात आले. व कश्याप्रकारे जनावराची काळजी घ्यावी यासंदर्भात पशु सखी सौ.शारदा रितेश आसमवार यांनी मार्गदर्शन केले.
पशुपालकांनी घ्यावयाची काळजी?
१) लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
2) जनावरांच्या गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
३) निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
४) गायी आणि म्हशींना एकत्रित ठेवू नये.
५) लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरू करावे.
६) बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता आणि तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
७) बाधित जनावरांचा मृत्यू झाला तर कमीत कमी 8 ते 9 फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
८) मृत जनावरांच्या खाली आणि वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत