Top News

विशाल शेंडे यांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार जाहीर.

विशाल शेंडे यांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार जाहीर


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड केली जाते. सन २०२१-२२ या कालावधीत महाविद्यालयात तसेच इतर क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डॉ.आंबेडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,चंद्रपूर येथील विशाल मनोहर शेंडे याला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाविद्यालयात होणाऱ्या प्रत्येक उपक्रम ,कार्यक्रमात विशाल हिरहिरीने सहभाग घेत होते.विशालने स्वगावात विद्यार्थ्यांच्या सहकार्याने अनेक उपक्रम करत होते. वृक्षारोपण,स्वच्छ्ता जागृती, एड्स जनजागृती,वृक्षांना राखी बांधणे, साक्षरता अभियान, युवा मित्रांच्या सहकार्याने गावात वाचनालयाची निर्मिती, मतदान जनजागृती, रॅली, पथनाट्य, रक्तदान शिबिराचे आयोजन, व्यसनमुक्ती जनजागृती,थोर महापुरुषांची जयंती ,पुण्यतिथी साजरी, विद्यार्थ्यासाठी निबंध,वकृत्व ,चित्रकला आदी स्पर्धेचे आयोजन, ई-पीक नोंदणीसाठी शेतकऱ्यांना मदत, अंधश्रद्धा निर्मूलन, वृद्धाश्रमात फळे वाटप, आपत्कालीन रुग्णांची मदत, नेत्रदान शिबिरात सहकार्य, कोरोना महामारीच्या काळात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यााठी आरोग्य तपासणी शिबिरात सहकार्य, मास्कचे वितरण, फवारणी, टीकाकरन उत्सवात सहकार्य,लसीकरण, सिएम केअर फंडात निधी गोळा आणि मित्रांना आवाहन आदी कार्य केले.
या पुरस्काराचे वितरण विद्यापीठाचा ११ वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून २ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी २ वाजता गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे. विशालच्या या यशाबद्दल डॉ.आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेश दहेगावकर, डॉ.मिलिंद भगत, महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद,आई-वडील,मित्र परिवार यांनी कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने