(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर येथील रहिवासी आनंद ईंद्रपाल दहागावकर प्रवास करत असलेल्या वाहनाला 03-09-2022 च्या रात्रो 12 वा च्या सुमारास येनबोडीच्या जवळ अज्ञात वाहनाने धडक दिली.त्यात ईंद्रपाल दहागावकर यांचा मृत्यू झाला.
अचानक झालेल्या घटनेने त्यांचा कूटूंबावर दू:खाचा डोंगर कोसळला.या घटनेची माहीती होताच नेहमी गरजूंसाठी धावून जाणारे माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांनी आपत्तीग्रस्त कूटूंबाची भेट घेऊन आर्थिक मदत करून त्यांची सांत्वन केले.तसेच शासनाकडून मदत मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले.वेळेवर संकट परिस्थितीत मदत केल्याबद्दल कूटूंबीयांना दिलासा मिळाला व त्यांनी अमरभाऊंचे आभार मानले.
त्यावेळेस तिथे संतोष मूगलवार ग्रा पं.सदस्य सकमूर, स्वप्नील अनमूलवार सदस्य ग्रा पं धाबा, अरूण कोडापे माजी पं स उपसभापती,किशोर घूबडे, सिद्धार्थ दहागावकर, गौतम झाडे,लक्ष्मण झाडे, सूरज दहागावकर व गावकरी उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत