Top News

चंद्रपुर गणेश मंडळांची हाक, सुधीर भाऊंची साथ chandrapur DJ

 चंद्रपूर शहर तथा जिल्ह्यात डिजे वाजविण्यास परवानगी


चंद्रपूर:- गेली १ महिन्यापासून आपण सर्व गणेश मंडळ पदाधिकारी व डीजे व्यावसायिक एकाच चिंतेत होतो की ह्यावर्षी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डीजे व्यावसायिकांना डीजे वाजवण्यास परवानगी मिळणार की नाही. ह्या चिंतेत सर्व व्यवसायिक व कर्मचारी होते. त्याच वेळी डीजे व्यावसायिक यांनी गणपती प्रतिष्ठान चे अध्यक्ष सौरभ ठोंबरे यांचे कडे गेले त्यावेळी ह्या सर्व प्रकारावर लक्ष करीत त्यांनी ह्याकरिता पाठपुरावा केला. तसेच पोलिस अधिक्षक तथा ठाणेदार यांचेशी बैठका घेतल्या. त्यातच नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना गणपती प्रतिष्ठान तर्फे शासकीय विश्राम गृह येथे निवेदन देण्यात आले.

ना. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री साहेबांना सोबत बोलतो अशी हमी दिली. यावेळी गणपती प्रतिष्ठान अध्यक्ष सौरभ ठोंबरे, उपाध्यक्ष श्याम बोबडे, प्रतिक हारने, अक्षय चवरे, सोनु चवरे, समस्त गणेश मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, साऊंड असोशिएशन, DJ व्यावसायिक उपस्थित होते.
दुसऱ्याच दिवशी भाऊंनी सर्व मंडळ पदाधिकारी व प्रशासना सोबत बैठक घेऊन DJ परवानगी मिळवून दिली. DJ परवानगी मिळवुन दिल्या बद्दल ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार व सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी तथा पोलिस विभागातील सर्वांचे मनःपुर्वक आभार समस्त गणेश मंडळांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने