चिता भारतात परत येत असल्याने संपूर्ण देशाला आनंद #chandrapur #Rajura

आदर्श शाळेत सामाजिक वनीकरण विभाग द्वारे जनजागृती कार्यक्रम संपन्न.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
राजुरा:- सुमारे सत्तर वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेच्या नामिबिया येथून एकाच वेळी आठ चित्ते भारतात दाखल होणार आहे. या चित्यांना मध्यप्रदेशच्या कुनो येथील राष्ट्रीय अभयारण्यात सोडण्यासाठी स्वतः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. एकूण सोळा चित्ते भारतात आणायचे आहेत त्यापैकी आठ ही त्यांची पहिली तुकडी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाला भारतात दाखल होत आहेत. चित्त्यांना घेऊन येणारे विशेष विमान शनिवारी ग्वाल्हेरमध्ये पोहोचेल. तिथून विशेष हेलिकॉप्टरद्वारे त्यांना जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात आणण्यात येईल. चिता भारत देशात येत असल्याने संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण असून भविष्यात आपल्याला त्यांना प्रत्यक्ष बघता येईल. लुप्त झालेल्या या चिता प्रजातीला तब्बल 70 वर्षानंतर भारत देशामध्ये बघून आपल्याला नक्कीच आनंद होईल असे प्रतिपादन शोभा ऊपलवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग राजुरा यांनी केले.
आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या विद्यार्थ्यांकरिता सामाजिक वनीकरण विभाग चंद्रपूर, वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण कार्यालय मार्फत 17 सप्टेंबर ला चिता वन्यप्राण्यांचे भारतातील कुनो राष्ट्रीय उद्यान शिवपुर मध्य प्रदेश येथे येत असल्याबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
 यावेळी वनपाल व्ही.एम ल. कुंदोजवार, चव्हाण, ब्रम्हटेके, अनमुलवार, वनरक्षक तम्मेवार, शीतल ताकसांडे, लिपिक मेश्राम, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनपाल विलास कुंदोजवार यांनी केले तर आभार बादल बेले यांनी मानले. वनरक्षक शीतल ताकसांडे यांनी चिता भारतात येण्याच्या प्रक्रियेविषयी व चित्त्याविषयी सविस्तरपणे माहिती दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत