Top News

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं चंद्रपूर नगरीत होणार जंगी स्वागत #chandrapurचंद्रपूर मनपाचे मनसे माजी नगरसेवक सचिन भोयर यांचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येने १९ तारखेला चंद्रपुरात दाखल होणार
चंद्रपूर:- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौरा १८ सप्टेंबर पासुन सुरु होणार असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसे सैनिकांना देणारं कानमंत्र. महाराष्ट्रासह विदर्भातील तीन जिल्ह्यात नागपूर, चंद्रपूर व अमरावती मध्ये राज ठाकरे यांची करडी नजर असल्याचं बोललं जातंय. नागपूर, चंद्रपूर व अमरावती या तीनही महापालिकांवर मनसेचे विशेष फोकस केले जाणार असून या तीन शहरांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कार्यकर्त्यांच्या बैठका व व्यक्तिगत भेटीगाठी घेणार असल्याचं मनसे नेत्यांकडून सांगण्यात येतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या प्रस्तावित दौऱ्याची तयारी सुरू झाली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर महानगरपालिके चे माजी नगरसेवक सचिन भोयर यांचं चंद्रपुर जिल्ह्यात वेग-वेगळया भूमिकेत आंदोलनाने ते प्रसिद्ध आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख पदावर सचिन भोयर यांना मोठी जबाबदारी दिल्यापासून सचिन भोयर हे पक्षाचं नेतृत्व करत असल्याचं जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी चंद्रपूर शहरात मोठया प्रमाणात मनसे सैनिक येणार असल्याचं बोललं जातंय.
महानगर पालिकासांठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा  मनसे पक्ष भाजप - शिंदे गटाशी हात मिळवणी करणारं का? या प्रश्नाची  राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. असं असताना मनसे न "ऐकलां चलो रे " चा नारा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांच्या आदेशामुळे मुंबई महानरपालिका निवडणुकीत  सर्व २२७ जागांवर मनसे लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती मनसे नेते - संदीप देशपांडे यांनी सांगितलं. 
मनसे अध्यक्ष यांच्यासाठी रवी भवन येथील ९ नंबरचा बंगला राखीव ठेवण्यात आला आहे. राज ठाकरे हे १८, १९ सप्टेंबरला नागपूरला मुक्कामी असतील, त्यानंतर २० तारखेला चंद्रपूर येथे मुक्काम असेल. २१ आणि २२ तारखेला ते अमरावती येथे मुक्कामी असतील. २३ सप्टेंबर रोजी रात्री रेल्वेने मुंबईला रवाना होतील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने