Top News

निर्दयी...! सात दिवसाच्या मुलीला भर रस्त्यात टाकून बापाने काढला पळ #chandrapur #gondpipari

संग्रहित छायाचित्र 

चंद्रपूर:- सात दिवसाचा मुलीला भर रस्त्यात टाकून पळ काढणार्या बापाला गावकऱ्यांनी पकडले. त्याला थेट ग्रामपंचायत कार्यालायात डांबले. मुलीला उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे आज घडली. घटनेची माहीती पोलीसांना देण्यात आली. पोलीसांनी वडीलाला ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहीतीनुसार, शिरशी बेरेडी येथील कुमोद पौरकर या यूवकाशी यांच्याशी विठ्ठालवाडा येथिल भाग्यश्री शालीक देवतळे हीचा विवाह झाला होता.या दोघांना सात दिवसापुर्वी मुलगी झाली.शनिवारला मुलीला बघण्यासाठी वडील कुमोद आला होता. या दरम्यान भांडण झालं. सात दिवसाचा मुलीला तो निघाला. भाग्यश्री मुलीला परत घेण्यासाठी त्याचा मागे मागे धावत होती. भाग्यश्री आणि तिच्या सोबत असलेल्यांनी आरडाओरड केली. तेव्हा भर रस्त्यात सात दिवसाचा मुलीला टाकून वडील पळू लागला.मात्र गावकर्यांनी त्याला पकडले.त्याला विठ्ठलवाडा ग्रामपंचायत कार्यालयात आणल्या गेलं.
घटनेची माहिती गोंडपीपरी पोलिसांनी देण्यात आली. पोलीस घटनास्थळ कुमोद पौरकार यास ताब्यात घेतले. मुलीला रस्त्यात टाकल्याने तिला दुखापत झाली आहे.मुलीची हालचाल बंद झाली होती.मुलीला उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने