Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित #chandrapur


चंद्रपूर:- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जिल्ह्यांतर्गत लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार देण्यात येणार आहेत. तरी, जिल्ह्यातील नागरिकांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.
ही आहेत शिबिराची स्थळे:

दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा, 21 सप्टेंबर रोजी एन.एच. महाविद्यालय ब्रह्मपुरी, 22 सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह गोंडपिपरी, 26 सप्टेंबर रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदुर तर 27 सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह चिमूर या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत