संतप्त रामनगरवासिय महिलांचे पाण्यासाठी 'रास्तारोको" आंदोलन #chandrapur


एक तास वणी-घुग्घुस मार्गावरील वाहतूक ठप्प
चंद्रपूर:- घुग्घुस येथील वेकोलिच्या रामनगर वसाहतीसाठी वेकोलितर्फे मागील ८ दिवसापासून पिण्याचे पाणी सोडण्यात येत नसल्याने रविवारी, १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घुग्घुस-वणी मार्गावरील वेकोलिच्या जल शुद्धीकरण संयंत्रा जवळ संतप्त रामनगरच्या महिलांनी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, कामगार नेते श्रीकांत सावे यांच्या समवेत "रास्तारोको" आंदोलन करीत रस्त्यावर ठिय्या मांडला.


त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली व लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या. आंदोलना दरम्यान संतप्त महिलांनी रामनगर वासियांना पाणी द्या, वेकोलि अधिकारी मुर्दाबाद अशी प्रचंड नारेबाजी व घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वेकोलिच्या रामनगर वसाहतीला पाणी पुरवठा करणारा पंप नादुरुस्त असल्याने मागील ८ दिवसापासून रामनगर वसाहतीचा पाणी पुरवठा ठप्प झाला. त्यामुळे संतप्त महिलांनी वेकोलिच्या जल शुद्धीकरण संयंत्राच्या कार्यालयात धडक देत रस्त्यावर ठिय्या मांडून "रास्तारोको" आंदोलन केले.
वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी आम्ही पाणी देऊ शकत नाही, आम्हाला नौकरी वरून काढून टाका असे भाष्य केल्याने संतप्त महिला आक्रमक झाल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनकांशी चर्चा करावी अशी मागणी रेटून धरली.
सहा.पो.नि. संजय सिंग व उपक्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश फुलारे यांनी आंदोलनकांशी चर्चा केली. आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन दिले. वेकोलितर्फे मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, श्रीकांत सावे, मनीषा महाकुलकर, अनिता पोगला, राधा गद्दल, कन्नोरीताई, कैथल ताई, जुनघरी ताई, रामटेके ताई, करमनकर ताई, गीता आईला, पिंकी ताई, आक्केवार ताई, भोयर ताई, पारखी ताई, ओमकार ताई, दुर्गाताई, छायाताई मोरे, लावण्या वडेट्टीवार, बुज्जी ताई, अर्चना फुलकर, संध्या गुडदे, छाया उमरे, शुभांगी उमरे, शशिकला काळे, रंजीता पोचमपल्लीवार, सोनू पाल, पिंपळकर ताई, बांदूरकर ताई, निर्मलाताई, प्रीती दहीकर, पार्वती झाडे, पोर्णिमा ढोके, नयना डोके, कोंकटी ताई, सुवर्णा नाथर तथा असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत