कन्हाळगाव अभयारण्यातील विकासकामे सुरू करा #gondpipari #rajura #chandrapur

Bhairav Diwase

सौरव मोरे यांची ना. सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाद्वारे मागणी
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील कन्हाळगाव हे अभयारण्य म्हणून घोषीत करण्यात आले होते. पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे अभयारण्यात विकास कामे सुरू करण्यात आलेले नाही. परिणामी यामुळे परिसरातील जंगलावर अवलंबुन असलेल्या लोकांचे रोजगार बंद झालेले आहे. तरी लवकरात लवकर अभयारण्यातील विकास कामे सुरू केल्यास परिसरातील जनतेस रोजगार उपलब्ध होईल व आर्थिक सुबकता अभयारण्यातील कामे झाल्यास परिसरातील गावाचा सुद्धा किवास होईल. सदर विषयाकडे आपण जातीने लक्ष देऊन अभयारण्यातील विकास कामाकरीता संबंधित विभागाला सुचना कराव्यात. अशी सौरव मोरे यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.