दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक #arrested


गडचिरोली:- गडचिरोली पोलिकांनी नक्षलविरोधी अभियानांतर्गत शुक्रवारी 2 संशयितांना ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान हे दोघेही जहाल नक्षलवादी असून त्यांच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस असल्याची माहिती पुढे आलीय. सनिराम उर्फ शंकर कृष्णा नरोटे (मोरचुला ता. धानोरा) आणि समुराम उर्फ सूर्या नरोटे अशी या दोघांची नावे असून त्यांना धानोरा अंतर्गत येणाऱ्या सावरगावातून अटक करण्यात आली होती. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यासंदर्भात गोयल यांनी सांगितले की, सनिराम नरोटे हा ऑक्टोबर 2015 पासून टिपागड दलममध्ये सामील होऊन डीव्हीसीएम जोगन्नाचा अंगरक्षक म्हणून 2018 पर्यंत कार्यरत होता त्याच्यावर खून , जाळपोळ, चकमकअशा अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता .शासनाकडून त्याच्यावर 8 लाखांचे बक्षीस ठेवले होते. तर समुराम नरोटे हा जनमिलिशिया दलमचा सदस्य होता. त्याचा खून,जाळपोळ,चकमकी इत्यादी गुन्ह्यात सहभाग होता शासनाने त्याच्यावर 2 लाखाचे बक्षीस ठेवले होते.
अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांकडून वरिष्ठ नक्षलवादी कॅडर कडून त्यांना उत्तर गडचिरोली मध्ये नक्षल चळवळी बाबत माहिती घेण्यासाठी पाठविण्यात आले होते. अशी माहिती पोलीस चौकशी पुढे आली आहे.या दोघांच्या अटकेमुळे उत्तर गडचिरोली मध्ये नक्षलवाद्यांना पुन्हा पाय रोवण्याच्या इराद्याला आळा बसला असल्याचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी सांगितले.
या पत्रपरिषदेत अप्पर पोलीस अधीक्षक सोमय्य मुंडे,अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख,अहेरी चे अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत