चंद्रपूर:- सेस्टोबॉल फेडरेशन ऑफ इंडिया (आर) 4th सिनिअर व 4th ज्युनिअर राष्ट्रीय सेस्टोबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन 30 सप्टेंबर 2022 ते 02 ऑक्टोबर 2022 दरम्यान दिल्ली पब्लिक स्कूल, बंगलोर दक्षिण कर्नाटक येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघातील सिनिअर मुले व सिनिअर मुली यांनी कांस्य पदक पटकाविले.
सरदार पटेल महाविद्यालयाने खेळाडूंवर केला अभिनंदनाचा वर्षाव
खेळाडूंनी विजयाचे श्रेय महाराष्ट्र सेस्टोबॉल असोसिएशनचे सचिव चौधरी सर, तर स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे कोच म्हणून अंकीत सर, मंगेश सर, पवार सर, नरेश सर, सागर सर, दक्षता मॅम यांना दिले.