Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

आदित्य भाके यांची युवा स्वाभिमान पार्टी च्या चंद्रपूर जिल्हा सचिव पदी नियुक्ती.

आदित्य भाके यांची युवा स्वाभिमान पार्टी च्या चंद्रपूर जिल्हा सचिव पदी नियुक्ती.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- आदित्य भाके हे गेल्या 12 वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे.आदित्य भाके यांनी २०१० मध्ये सूरज ठाकरे यांच्या नेतृत्वात राजकारणाची महारष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सुरवात केली होती. त्यानंतर आदित्य भाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून विद्यार्थि तालुका अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काम करत असताना राजुरा तालुक्यातील विविध गावात संपर्क साधून जनतेच्या हिताकरिता काम केले.जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याकरिता विविध प्रकारचे आंदोलन सुद्धा छेडले होते.आदित्य भाके यांनी राजुरा नगरपालिकेतील निवडणुकीत आपल्या मातोश्री सौ.साधना भाके यांना अपक्ष उभे करून सत्ताधारी आणि मोठमोठ्या नेत्यांना घाम फोडला होता.
   आदित्य भाके यांच्या मातोश्री नगरपालिकेत अपक्ष नगरसेविका त्यानंतर आरोग्य सभापती, महिला बालकल्याण सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले.आदित्य भाके यांनी गेल्या वर्षी युवा स्वाभिमान पार्टी मध्ये राजकीय गुरू सूरज ठाकरे यांच्या नेतृत्वात प्रवेश केला होता आता सूरज ठाकरे यांनी आदित्य भाके यांना युवा स्वाभिमान पार्टी चंद्रपूर जिल्हा सचिव पदी नियुक्ती केली त्यामुळे आता युवा स्वाभिमान पार्टी येत्या नगरपालिकेत निवडणूक लढाऊन कोणाला घाम फोडणार याकडे जनतेच लक्ष लागलेलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत