Top News

"त्या" वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:- जिल्हाध्यक्ष भाजयुमो विशाल निंबाळकर


चंद्रपूर:- मंगळवार (27 सप्टेंबर)ला गडेगाव-विरुर (कोरपना) येथील पवन देवराव मेश्राम या तरुणाद सापाने चावा घेतल्याने त्याला रात्री 2 च्या सुमारास ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे भरती करण्यात आले.
प्रथमोपचार करुन त्याला चंद्रपूर शासकिय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले.तर त्याच सापाने मुलीला दंश केल्याने तिलाही चंद्रपूर येथील रुग्णालयात रुग्ण भरती केल्यानंतर संबंधीत नातेवाईक सोबत असतांना त्यांनी रुग्णाला अती तात्काळ जीवनावश्यक सेवा (आय.सी.यु.) मध्ये ठेवण्याची मागणी केली असता, संबंधित डॉक्टरांनी दुर्लक्ष करुन रुग्णाला सामान्य वार्डात उपचाराकरीता ठेवले. मात्र त्या वार्डात कर्मचारी व डॉक्टर यांनी काळजीपूर्वक सेवा दिली नाही परिणामी पवन मेश्राम सकाळी 07वाजता दगावला.या सर्व प्रकारास रुग्णालय प्रशासन जवाबदार असून.संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महानगर भाजपा तर्फे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष(श)डॉ मंगेश गुलवाडे,महामंत्री ब्रिजभूषण पाझारे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबालकर, अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष,महामंत्री बंडू गौरकर,अखिलेश रविदास,नरेंद्र सी पावर,मारुति यात्रा,गंगाधर शर्मा, रवी लोणकर,सचिन कोतपल्लीवार, गीता गेडाम, प्रज्ञा बोरगमवार यांची उपस्थिती होती.
मृतकाच्या परिवारास 10 लाखांची मदत करा

शासकिय रुग्णालयातील ढेपाळलेली यंत्रणा या प्रकारास जवाबदारआहे.व्हेंटिलेटर असतांना त्याचा वापर नाही.ही बाब गंभीर आहे.पवनला व्हेंटिलेटर ची सेवा मिळाली असती तर त्याचा जीव वाचला असता. पवन मेश्राम हा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत होता. घरातील कर्तापुरुष गेल्याने परिवारावर मोठे संकट आले आहे.तेव्हा उपचाराय हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मेश्राम परिवाराला 10 लाख रुपयांची मदत करावी,अशी मागणी यावेळी महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने