Top News

३५ वेळा रक्तदान करुन समाजाला दिली नवी प्रेरणा #blooddonation


कपिल मेश्राम यांचे रक्तदानातून समाजकार्य
सिंदेवाही:- तालुक्यातील रत्नापुर येथील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले, सुशिक्षित तरुण कपिल सदाशिव मेश्राम त्याने काळाची पाऊले ओळखत रक्तदान करून समाजासमोर एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.सातत्याने कार्यक्रमाचे औचित्य साधून रक्तदान करीत आले आहे. आतापर्यंत त्यांनी ३५ वेळा रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासत तरुणांना रक्तदानाचा मौलिक संदेश देत आले आहेत.
मागील १७ वर्षापासून सामाजिक
कार्यात अग्रेसर असलेले कपिल मेश्राम हे समाजाला देणे म्हणून विविध उपक्रमात भाग घेऊन रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासत आले आहेत. वयाच्या १८वर्षापासून ते रक्तदान करीत असून,आजपर्यंत रक्तदाता कपिल मेश्राम यांनी ३५ वेळा रक्तदान केले आहे.
नुकताच श्री. गुरुदेव नवयुवक दुर्गा मंडळ रत्नापुर येथे३५ वा रक्तदान करुण ,मान मिळविला आहे. कुणी पेशंट दवाखाना मधे भरती असेल आणि त्या रुग्णाला रक्तची गरज असेल तर लगेच रक्तदान करण्यासाठी ते तयार असतात. आजपर्यंत बरेच रुग्णना यांनी रक्त दिला आहे. यांचा रक्तगट "ओ"पॉजिटिव असल्याने सर्वाना उपयोगी पड़ते. अनेक रक्तदान शिबिरमधे रक्तदान करून नवरगांव परिसरात नवाकीर्तिमान रचला आहे. सध्याच्या स्वार्थी युगात प्रत्येक व्यक्ती हा आपला स्वार्थ साधत
असतो. अशा या गोष्टींना तिलांजली देत समाजासाठी, जनतेसाठी रक्तही द्यायला तयार होणारे रक्तदाता कपिल सदाशिव मेश्राम यांचा आदर्शपाहून त्यांचे मित्र सुद्धा रक्तदान करण्याकरिता पुढाकार घेत आहेत. त्यांना प्रोसाहन करुण तरुण पिढ़ीसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान आहे हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. एखाद्याला जीवनदान देण्यापेक्षा मोठे दान नसून रक्तदानातून हे शक्य आहे. यामुळेच रक्तदानाला जीवनदान म्हटले जाते. यांच्या गौरवशाली कार्यामुळे माजी जि. प. सदस्य रमाकांत लोधे चंद्रपुर, सदाशिवराव मेश्राम माजी सरपंच ग्राम पंचायत रत्नापुर, संजय गहाने माजी त. मु. स अध्यक्ष रत्नापुर, मंगेश मेश्राम ग्राम. प. सदस्य, वासुदेव दडमल ग्राम प. सदस्य प्रविण कामडी ग्राम प. सदस्य, इमरान पठान ग्राम. प. सदस्य रत्नापुर, नरेंद्र गहाणे पोलिस पाटिल रत्नापुर,रूपेश मेश्राम, दिलीप मेश्राम, सुरेश रामटेके मूल, आनंद बोरकर (कल्याण) मुंबई, निला आनंद बोरकर (कल्याण)मुंबई,भीमाताई सुरेश रामटेके मूल,नरेंद्र बंसोड़ नांदगांव,प्रभाकर शेंडे तळोधी,सुनिल डेकाटे,अजय मेश्राम, आदी लोकांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने