Top News

डॉ. बंडू रामटेके बनले शल्य चिकित्सक.

डॉ. बंडू रामटेके बनले शल्य चिकित्सक.
मूल शहरात आनंदाचे वातावरण

(आधार न्युज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात
मूल:- मूल शहरातील निवासी, गुणवंत वैदयकीय अधिकारी डॉ. बंडू रामटेके यांची चंद्रपूर जिल्हा रूगणालयाचे नवे शल्य चिकित्सक म्हणून पदभार स्विकारल्यानंतर शहरवासीय आनंदीत झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
मूलनिवासी डॉ. बंडू रामटेके यांचे बालपण व 12 वी पर्यंतचे शिक्षण मूल येथेच झालेले आहे. उपजिल्हा रूग्णालय मूल येथे वैद्यकीय अधिक्षक म्हणून मोठी सेवा दिलेली आहे.
 चंद्रपूरचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निवृत्ती राठोड यांची नागपूर येथे बदली झाल्यामुळे रिक्त जागेवर जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ. रामटेके यांनी पदभार सांभाळला आहे. गत अनेक वर्षापासून ते चंद्रपूर जिल्हा रूगणालयात वैद्यकीय अधिकारी वर्ग.. 1 या पदावर  काम करीत होते.
कोरोना काळात डॉ. बंडू रामटेके यांनी दोन्ही लाटेत 250 बेड कोरोना रूग्णालयाचे नोडयुल ऑफीसर म्हणून केलेले काम प्रशंसनीय राहीले आहे.
तत्कालीन आरोग्यमंत्री ना. टोपे, वैदयकीय शिक्षण मंत्री ना. अमित देशमुख यांचे हस्ते राजभवनात सत्कार करण्यात आला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने