Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

अनोळखी मृत महिलेची ओळख पटविण्याचे पडोली पोलिसांचे आवाहन #chandrapur#police

चंद्रपूर:- पोलिस स्टेशन पडोलीच्या हद्दीतील ताडाळी टी-पॉईंट जवळ 1 नोव्हेंबर रोजी एक 35 वर्षीय अनोळखी महिला मृत अवस्थेत आढळून आली. सदर महिला रोडवर झोपली असता व तिला उठवले असता ती कोणतीच हालचाल करीत नसल्याने स्थानिक बारवेटर आकाश ढोक यांनी डायल 112 वर फिर्याद दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता ती महिला मृत अवस्थेत होती. तोंडी फिर्यादीवरून पोलिसांनी मर्ग दाखल करून तपास सुरू केला आहे.
मृतक महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे : वय अंदाजे 35 वर्ष, रंग गोरा, उंची पाच फुट, डोक्याचे केस काळे व लांब, अंगात शेंदरी रंगाची टि-शर्ट व हाप बरमुडा घातलेला असून उजव्या हातावर ओम गोंदलेले आहे.
सदर वर्णनाची महिला कोणाच्या ओळखीची असल्यास त्यांनी पोलिस ठाण्यात ओळख पटविण्याचे आवाहन पडोली पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार भुषण टोंग यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत