रोड अपघातात पती-पत्नी ठार #chandrapur #accident


चंद्रपूर:- करंजी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघात मोटरसायकल वरील पती-पत्नी ठार झाल्याची दुर्दैवी घटना दि. १७ नोव्हेंबरला घडली. ट्रक आणि मोटरसायकलच्या जोरदार धडकेत मोटरसायकलवर असलेले पती-पत्नी ठार झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्ग 44 असलेल्या करंजी रोडवर 17 नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास लांडगे दाम्पत्य आपल्या दुचाकीने MH34 BX6739 ने पांढरकवडा च्या दिशेने निघाले होते. मागून कानपुर वरून हैद्राबाद च्या दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक UP92 T3569 ने दुचाकीला जोरदार धडक देत चिरडले. दरम्यान या अपघातात मोटरसायकलवर जात असलेले गोकुळदास लांडगे (वय ५५) सुनिता गोकुळदास लांडगे (वय ४५) या दोघा पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होवून घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास पांढरकवडा पोलिस करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत