Top News

स्व. श्रद्धा वालकर क्रूर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब ला फाशीची शिक्षा द्या:- अंजली घोटेकर #chandrapur


चंद्रपूर:-वसईतील २६ वर्षीय श्रध्दा वालकरच्या खूनाने देश हादरला आहे. प्रियकर आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धाचा खून करुन तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर सलग १८ दिवस आफताब श्रद्धाचे तुकडे जंगलात फेकत होता. सहा महिन्यानंतर हे हत्याकांड समोर आलं आहे. दिल्ली येथे श्रद्धाचा लव्ह जिहादने बळी घेतला. हि घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. असे भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर निषेधार्थ आंदोलनात बोलत होत्या. हे निषेध आंदोलन वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महिला मोर्चा महानगर तर्फे चंद्रपूर शहरातील महात्मा गांधी चौकामध्ये घटनेचा निषेध केला. व श्रध्दाला श्रद्धांजली अर्पण केली.

दिल्लीमध्ये श्रद्धा वालकर यांची हत्या करण्यात आली. आफताब नावाच्या व्यक्तीने ही हत्या केली आणि तिच्या शरीराचे 35 तुकडे करून वेगवेगळ्या परिसरात फेकण्यात आले. या घटनेचा निषेध करण्याकरिता दिनांक १७ नोव्हेंबर स्थानिक महात्मा गांधी चौकात भाजपा महिला मोर्चा महानगर चंद्रपूरच्या वतीने निषेध व्यक्त करून मेणबत्त्या लावून श्रध्दाला श्रध्दांजली वाहण्यात आली व तिला न्याय मिळण्याकरिता मागणी करण्यात आली. आरोपी आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी पोलीस अधीक्षक चंद्रपूर व्दारा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे भाजपा महिला मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर यांनी निवेदनाद्वारे केली.
यावेळी शिला चव्हाण, मायाताई उईके, चंद्रकला सोयाम, प्रभा गुडधे, सिंधू राजगुरे, रुपाली आंबटकर, मोनिशा माहतव, रेणू घोडस्वार, शालू कन्नोजवार, रजिता येले, विशाखा राजुरकर, लिलावती रविदास, तसेच भाजपा महिला मोर्चा महानगर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने