हनुमान मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करा, यंग चांदा ब्रिगेडची मागणी #chandrapur #ballarpur


पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांना निवेदन


चंद्रपूर:- चंद्रपूर-बल्लारपूर (chandrapur-ballarpur) महामार्गावरील भिवकुंड नाल्याजवळ असलेल्या श्री. हनुमान मंदिरातील (Hanuman mandir) हनुमान मुर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक (arrested) करण्याची मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असुन सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांना देण्यात आले आहे.

विसापूर (Visapur) गावाजवळ असलेल्या श्री. हनुमान मंदिरातील हनुमान मूर्तीची विटंबना केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर भक्तांनी येथे मोठी गर्दी केली होती. यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांनीही सदर ठिकाणची पहाणी केली. त्यानंतर यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांची भेट घेत मुर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हा अध्यक्ष पंकज गुप्ता, शहर युथ अध्यक्ष कलाकार मल्लारप, राशेद हुसेन, प्रतिक शिवणकर, सलीम शेख, राम जंगम, अमन खान, दिनेश इंगळे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत