Top News

राजुरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला खिंडार #chandrapur #gondpipari


नगरसेविका शारदा गरपल्लीवार व त्यांचे पती खेमदेव गरपल्लीवार यांचा भाजपात प्रवेश


गोंडपिपरी:- चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत दि. २४ नोव्हेंबरला भाजपा जनसंपर्क कार्यालय चंद्रपूर येथे गोंडपिपरी (Gondpipari) नगरपंचायतीच्या नगरसेविका शारदा गरपल्लीवार व त्यांचे पती खेमदेव गरपल्लीवार यांनी भारतीय जनता पार्टीत (Bhartiya Janata party) प्रवेश केला.


गोंडपिपरी नगरपंचायतीच्या निवडणूकित अपक्ष म्हणून शारदा गरपल्लीवार स्व-बळावर निवडून आल्या होत्या. निवडून आल्यानंतर बिन शर्त शारदा गरपल्लीवार काँग्रेस पक्षाला समर्थन देण्याचा निर्णय गरपल्लीवार यांनी घेतला. आणि सत्ता स्थापने वेळेस पाठींबाही दिला. गोंडपिपरी नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता बसली. तत्पूर्वीच गरपल्लीवार दाम्पत्याने राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात प्रवेशही केला. पक्षश्रेष्ठींवर ठेवलेल्या विश्वासास तडा गेल्याने काँग्रेसला सोडून भाजपात प्रवेश केला.


या पक्ष प्रवेश वेळी भाजप नेते आणि माजी जि. प. सदस्य अमर बोडलावार. चेतन गौर नगरसेवक तथा गट नेता गोंडपिपरी, दिपक सातपुते माजी सभापती गोंडपिपरी. लक्ष्मी बालुगवार सरपंच. सुनील धाबर्डे उपसरपंच, भाजयुमो शहराध्यक्ष प्रशांत येल्लेवार, भाजपा कार्यकर्ता राहुल चौधरी. बंटी बोनगीरवार उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने