स्वावलंबी जगण्याचा
उपकार लाखमोल
ऋणी धरणी आईचा...१
लहानचा मोठा झालो
याच आईच्या कुशीत
लाभे निरोगी आरोग्य
दृढ देहाचे गुपीत......२
धन धान्याची संपत्ती
द्रव खनिजांची खाण
छत्र सावली देणारी
तुझ्यामुळे ताठ मान.....३
फळ फुले पालेभाज्या
आयुर्वेद धन्वंतरी
तूच आहे वरदायी
आई लेकराची खरी....४
कसे फेडू उपकार
दास होऊन जगतो
ऋणी धरणी आईचा
प्रण रक्षणाचा घेतो....५
तुला हरित ठेवून
आणू धरेवर स्वर्ग
सृष्टीचक्र सुरक्षित
ठेवू हिरवा निसर्ग...६
हर्षा भुरे, भंडारा