Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

मोर्चेकरी लोककलाकारांना मुनगंटीवारांचा दिलासा #Chandrapur


शासन लोककलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही


चंद्रपूर:- विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळावर मोर्चा घेऊन आलेल्या लोककलाकारांच्या बहुतांश मागण्यांशी सहमती दर्शवत सांस्कृतिक कार्य मंत्री ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलासा दिला. शासन लोककलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

राज्यातील विशेषतः विदर्भातील लोककलाकारांच्या समस्यांसंदर्भात लक्ष वेधण्याकरता तसेच विविध मागण्या मांडण्याकरता लोककला सेवा मंडळाने विधिमंडळावर मोर्चा काढला होता. त्यांच्या शिष्टमंडळासोबत सांस्कृतिक मंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विस्तृत चर्चा केली. त्यांच्या मागण्यांसंदर्भात या चर्चेदरम्यानच त्यांनी विविध निर्देश विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

लोककलाकारांच्या बहुतांश मागण्या रास्त असल्याचे मत मंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले. अशा रास्त मागण्या विनाविलंब मान्य करण्याकरता योग्य ती पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी विभागाला केल्या. शासन लोककलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभे असून लोककलाकारांनी निश्चिंत राहावे, असे सांगत त्यांनी भेटीसाठी आलेल्या लोककलाकारांना आश्वस्त केले.

यावेळी लोककला सेवा मंडळाचे पदाधिकारी श्री. अलंकार टेंभुर्णे, श्री. मनीष भिवगडे, श्री. राजकुमार घुले आदि कलाकार प्रतिनिधी चर्चेत सहभागी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत